सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेजची मागणी करण्यात आली होती. त्यास मंत्रीमंडळाची मान्यता देखील मिळाली होती. या कामाचे श्रेय शिवसेनेने घेतले. त्यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. या कॉलेजच्या जवळपासच पडवे येथे नारायण राणेंचे मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलदेखील आहे.
आमदार नितेश राणे यांनी सिधुदुर्गात मंजूर केलेल्या शासकीय महाविद्यालयात ट्विट करून प्रतिक्रिया दिली. हे शासकीय मेडिकल कॉलेज राणेंमुळेच मंजूर झाल्याचे म्हटले आहे. ‘नारायण राणे’ या नावाचा दबदबा सत्तेत असो की नसो नेहमीच मदतीस तयार असतो, माझा नेता लय पॉवरफुल!! अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली.
सिंधुदुर्गच्या राजकीय प्रवासात 1990 पासून कोणीही थांबवू शकले नाही. सर्व प्रकल्प राणेंच्या माध्यमातून होतात. किंवा त्यांच्यामुळे केले जातात. असेही त्यांनी व्यक्त केले.