माझ्याकडून पुढे अशी चूक होणार नाही; जान सानु

9

कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या ‘बिग बॉस’ 14 वे पर्व एका नवीन वादामुळे चर्चेत आला आहे. प्रसिद्ध गायक कुमार सानु यांचा मुलगा जान सानु याने एका संभाषणामध्ये मराठी भाषेची चीड येते असे वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे मराठी भाषिक दुखावले गेले. यामुळे जानवर सर्व स्तरातुन टिका करण्यात आल्या. मनसेने जानला माफी मागण्यांसाठी 24 तासाचा वेळ दिला होता. ‘बिग बॉसच्या’ कालच्या एपिसोडमध्ये बिगबॉसने जानला चुकीची जाणीव करून दिली. त्यामुळे नॅशनल टेलिव्हिजनवर जानला माफी मागावी लागली.


‘मराठी बांधवांची माफी मागून यापुढे अशी चूक पुन्हा होणार नाही, अशी ग्वाही जानने दिली आहे. मी नकळत चुक केली ज्याने मराठी माणसांच्या भावना दुखावल्या माझा तसा हेतू नव्हता, मी यासाठी माफी मागतो, पुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही, असे त्याने म्हंटले आहे. दरम्यान या प्रकरणात जान सानुच्या आईनेही भावना व्यक्त केल्या आहेत. ‘आम्ही महाराष्ट्राचा अपमान कसा करू’ असे म्हणत त्यांनी जानच्या चुकांवर पांघरून घातले. सध्या जान सानु बिगबॉसमुळे चर्चेत नसुन या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आहे.