कोरोनाचे संकट जगासह देशात आणि महाराष्ट्र राज्यात देखील आहे. कोरोनाच्या विषाणूच्या संक्रमनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आणीबाणीची स्थिती निर्माण झाली होती. या संकटाचा सामना करण्यासाठी 21 मार्च 2020 पासून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लावण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अल्प दरात सुरू केलेल्या शिवभोजन थाळीचा दर अजून कमी करण्यात आला आहे.
शिवभोजन थाळीचा दर 31 मार्च 2020 पर्यंत 5 रुपये करण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. नागरिकांच्या हिताची जोपासना व विकासासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.
2020 पासून 10 रुपये दराने शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात येत होती. परंतु कोरोनाच्या संकटात तिची किंमत 5 रुपये करण्यात आली होती. 2 जुलै रोजी पुन्हा 3 महिन्यांची मुदतवाढ करण्यात आली होती. आता हीच मुदत ऑक्टोम्बर पासून पुढचे 6 महिने म्हणजे पुढच्या वर्षापर्यंत वाढवण्यात आली आहे. शहरी भागात प्रतीथाळी 45 रुपये तर ग्रामीण भागात प्रतीथाळी 30 रुपये सरकारकडून अनुदान स्वरूपात दिले जातात. यासाठी राज्य सरकारकडून 160 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.