मिडियाचे टीआरपी रॅकेट; रिपब्लिक टिव्हीची चौकशी होणार…

20

मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची आज पत्रकार परिषद घेऊन, खोट्या टीआरपीचा रॅकेट हाती लागल्याची माहिती दिली. स्वतःच्या चॅनल टीआरपीसाठी मुंबई पोलिसांना बदनाम करण्यात आलं अस त्यांनी म्हटलंय. तसेच बदनामी करणाऱ्यांची नावे पोलिसांकडे आहेत. खोट्या टीआरपीसाठी एक टोळी कार्यरत आहे. टीआरपीला बदलण्याचं काम सुरु होतं. टीआरपी सोबत छेडछाड केली जात होती. अशी विस्तृत माहिती सुद्धा त्यांनी दिली.

घरामध्ये विशिष्ट चॅनेल सुरु ठेवण्यासाठी पैसे दिले गेले. काही विशिष्ट लोकांना चॅनेल सुरु ठेवण्यासाठी महिन्याला पैसे दिले  जात होते. इंग्रजी येत नसलेल्या घरात इंग्रजी चॅनेल सुरु होते. तसेच पैसे  देऊन टीआरपीशी छेडछाड केली जात होती. त्याचबरोबर अर्नाब गोस्वामी संपादक असलेल्या  टीव्हीचाही संबंध असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. या सर्व रॅकेटमध्ये रिपब्लिकचे प्रमोटर्सही सहभागी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.