बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाअक्षय यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जबरदस्ती गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार करून गर्भपात करण्यास प्रवृत्त करून धमकी दिल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. महाअक्षयने 38 वर्षाच्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशिप ठेवले होते. त्यांच्यावर गुरुवारी रात्री उशिरा ओशिवारा पोलीस ठाण्यात बलात्कार, गर्भपात, मानसिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2015 मध्ये ते एकमेकांच्या संपर्कात आले होते. या ओळखीनंतर ते एकमेकांचे चांगले मित्र बनले. काही महिने दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. त्यादरम्यान अंधेरीतील ओशिवारा येथील यमुनानगरच्या लष्करीया इमारतीत राहत असल्याने त्याने तिला घरी बोलवले होते. तिच्या सॉफ्ट ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध मिसळून तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले. हे प्रकरण तिला समजताचं त्याने मिटवून घेण्याचा प्रयत्न केला. नंतर तिला लग्नाचं वचन देऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तिला लग्नाचे अमिश दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अभिनेत्री गरोदर राहिली तेव्हा महाअक्षयने तिला जबरदस्ती गर्भपात करण्यास सांगितले. पीडित अभिनेत्रीने नकार दिल्यास तिला गोळ्या देऊन गर्भपात केला. विवाहाविषयी विचारल्यावर तो सतत टाळत होता.
या प्रकरणामध्ये मिथुन चक्रवर्तीची पत्नी योगिता बाली यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रार केल्यानंतर धमकी देऊन प्रकरण दाबून टाकण्यासाठी दबाव केल्याचा आरोप केला आहे. अभिनेत्रीने महाअक्षय चक्रवर्ती आणि योगिता बाली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून यांची चौकशी करण्याची विनंती केली आहे. दोघांविरुद्ध न्यायालयाने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईत हा गुन्हा घडल्याने तपास सुरू करण्यात आला आहे.