महाराष्ट्रात टप्याटप्याने अनलॉक होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारपासून मुंबईत मेट्रो सेवा सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकारने 15 ऑक्टोम्बरपासून मेट्रो सुरू करण्याची परवानगी दिली होती. कोरोनाच्या संकटामुळे आता 19 ऑक्टोम्बरपासून या सेवेची सुरवात होत आहे. मेट्रोमध्ये प्रवास करताना सरकारने दिलेल्या अटींचे पालन करणे आवश्यक आहे.
मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग मध्ये बसून प्रवास करणे. यादरम्यान प्रवेशद्वाराच आणि प्रवाशांच स्क्रीनींग होणार आहे. सकाळी 8.30 ते रात्री 8.30 या वेळेत मेट्रो धावणार आहे. लहान मुले आणि वृद्ध नागरिकांनी मेट्रोचा प्रवास टाळावा असे आवाहन करण्यात आले आहे. डिजिटल तिकीट, स्मार्ट कार्ड आणि क्यूआर कोड याचा वापर तिकिटासाठी करणे बंधनकारक आहे. प्रवासदरम्यान प्लॅस्टिक टोकन दिले जाणार नाही. आरोग्य सेतू मोबाइल मध्ये असणे बंधनकारक आहे.
नियमांचे पालन करून नागपूरमध्येही काही दिवसांपूर्वी मेट्रोची सेवा सुरू झाली. कोरोनाच्या काळात प्रवासी आणि कर्मचारी व अधिकाऱ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा. यासाठी महत्त्वाच्या उपाययोजना केल्या आहेत.