मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर गेले आहेत. ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे भरपुर प्रमाणात नुकसान झाले आहे. सांगवी, अक्कलकोट येथील शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत.पूर परिस्थितीची पाहणी करून शेतकरी आणि ग्रामस्थांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री दौरा करणार आहेत.
सांगवी खुर्द येथे नैसर्गिक आपत्तीमुळे घरांमध्ये पाणी शिरून झालेल्या नुकसानाची पाहणी व गावकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. बोरी नदीची व पुरग्रस्त भागाची पाहणी केल्यावर अक्कलकोट शहर हत्ती तलावाची पाहणी, तसेच उमरेगेमधील आपत्तीग्रस्त घरांची व शेतीपिकांच्या नुकसानीची पाहणी करत मुख्यमंत्री सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.