मुलींवर योग्य संस्कार नाहीत; म्हणून होतात बलात्कार : भाजप आमदार

20

आजच्या मुलींवर योग्य संस्कार नाहीत. त्यामुळे घटनांत वाढ होत आहे, असं बेताल आणि मूर्खपणाच वक्तव्य युपी मधील बलिया विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी यांनी केलं आहे.

“तरुण मुलींवर संस्कार करणं हा सर्वांचे काम आणि धर्म आहे. माझाही धर्म आहे, सरकारचा धर्म आहे. परंतु, कुटुंबाचाही हा धर्म आहे. सरकारचा धर्म संरक्षण करण्याचा आहे. तिथं मुलांना संस्कार देणं हा कुटुंबांचा धर्म आहे. सरकार आणि संस्कार मिळून देशाला सुंदर रूप देता येईल.” असं त्यांनी म्हटलं आहे.

“आपल्या तरुण मुलींना संस्कारीत वातावरणात राहण्याच्या, आणि शालीन व्यवहार दर्शवण्याच्या पद्धती शिकवणं हा आई-वडिलांचा आणि कुटुंबाचा धर्म आहे. अशा घटना फक्त चांगल्या संस्कारांनीच थांबवता येतील. अशा घटनांना शासन शासन थांबवू शकत नाही त्यांनी म्हटलं आहे.