मुलीने केलं दलीत आमदाराशी लग्न; ब्राम्हण पित्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

42

भारतात अजूनही प्रेम विवाहाला मान्यता समाजमान्यता मिळालेली नाही. आजही भारतात जात, धर्म बघून लग्न केली जातात. जावई आमदार असूनही दलीत आहे म्हणून मुलीच्या बापाने स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना तामिळनाडू मध्ये घडली आहे. त्याचा हा सविस्तर वृत्तांत..

तामिळनाडू मधील कल्लाकुरिची मतदारसंघाचे AIADMK पक्षाचे आमदार ए. प्रभू यांनी सोमवारी आपली प्रेयसी सौंदर्या हिच्याशी प्रेम विवाह केला. सौंदर्या ही ब्राम्हण जातीची आहे. तर आमदार प्रभू हे दलीत आहेत. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी या लग्नाला हरकत घेतली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोघांचे प्रेमसंबंध होते. मुलीचे वडील एस. स्वामीनाथन यांनी आरोप करत म्हटलं की, दोघांचे चार वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. आता सौंदर्या १९ वर्षांची आहे. ती अल्पवयीन आहे. आणि तरीही तिच्यासोबत आमदाराने प्रेम केले. हे सर्व आरोप आमदार प्रभू यांनी फेटाळून लावले आहेत. आम्ही केवळ मागच्या चार महिन्यांपासून प्रेमसंबंधात आहोत. आणि आम्ही लग्न केलं आहे. असं त्यांनी म्हटलंय.

“आमदार प्रभू हे आमच्याच घरात अनेक वर्षांपासून राहत आहेत. प्रभू यांना मी मुलासारखं मानलं. मात्र त्याने माझा विश्वासघात केला. मी या लग्नासाठी होकार दिलेला नाही. सौंदर्याला फूस लावून त्यांनी लग्न केलं आहे. दोघांच्या वयात १७ वर्षांचे अंतर आहे.” असं मुलीचे वडील स्वामिनाथन म्हणाले. त्यानंतर आमदार प्रभू यांनी सर्व आरोप फेटाळून लावत स्वतः आणि पत्नी सौंदर्या सोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे.