मुशाफिरी स्वभावातच असावी लागते..!

26

मुशाफिरी करणे स्वभावातच असावी लागते. तसं आपल्याला फिरायला खूप आवडते. बाबांनी घेऊन दिलेली शाईन बाहेर काढायची, गाडीत पेट्रोल व्यवस्थित आहे का ते पहायचे आणि टांग टाकून मस्त वाटेल तिकडं मनमोकळ फिरायचं. वाटेत कुणी ना कुणी अजनबी भेटतोच ज्याच्याशी बोलावस वाटत, त्याची काहीतरी अडचण असते, ती जाणून घ्यावीशी वाटते. काही प्राचीन वास्तू डोळ्यासमोर येतात. त्याविषयी कुतुहल निर्माण होते. मग त्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो.

यापैकीच एक असलेली ही निजाम कालीन “चौकी”. हैद्राबाद नावाचं संस्थान जेव्हा निजामाच्या ताब्यात होते. तेव्हापासून या चौ क्या आस्तित्वात आहेत. लहानपणी आम्ही कल्याणच्या यात्रेला बाजी उम्रद मार्गे जायचो तेव्हा या चौ क्या आमचं ध्यान आकर्षिक करायच्या.

या चौक्या का निर्माण करणयात आल्या काय आहे याचे ऐतिहासिक महत्व हे आम्ही जाणून घेण्यचा प्रयत्न केला बाजी उम्रद चे रहिवाशी असलेले पोलिस पाटील यांच्याकडून. ते सांगतात, निजामकाळात मराठवाड्यातील शेतमाल विदर्भात विकण्यास सक्त मनाई होती. यासाठीच या चौक्या निर्माण करण्यात आल्या. विदर्भ आणि मराठवाडयाच्या सिमेरेषेवर असलेल्या बाजीउम्रद गावचे उपसरपंच शरद डोंगरे यांच्याशी देखील आम्ही संवाद साधला. ते म्हणाले, गावच्या बाजूला एक आणि गावात एक अशा दोन चौक्या या ठिकाणी होत्या. यातील एक गावातील लोकांनी लिलाव करून विकली तर दुसरी चौकीची आज ही दुरावस्था आहे. इतिहास कसाही असो, त्रासदायक असो की उल्हासवर्धक मात्र या चौक्या या ईतिहासाच्या पाउलखुणा आहेत. त्यांच जतन आणि संवर्धन होणं हेही तितकच आवश्यक आहे.