मुहूर्त ठरला! खडसे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

34

माजी मंत्री आणि भाजपच्या राज्य नेतृत्वावर नाराज नेते एकनाथ खडसे यांची पक्षांतर करण्याची चर्चा सुरू आहे. एकनाथ खडसे स्वतःवर अन्याय झाला आहे असे म्हणत यासाठी देवेंद्र फडणवीसांना जबाबदार ठरवत आहेत. या चर्चांवरुन खडसे पक्षांतर करणार आहेत असे स्पष्ट दिसत आहे. गेली महिनाभर या चर्चा सुरू असताना शनिवारी 17 ऑक्टोम्बरला घटस्थापनेच्या मुहूर्तावर या चर्चांना पुर्णविराम मिळणार आहे. असे सूत्रांनी सांगितले आहे.

दरम्यान, जळगावमधील जामनेर येथे मंगळवारी माध्यमांशी बोलतांना विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी ‘खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आमच्या सोबत राहिलं पाहिजे अशी पक्षाची इच्छा आहे, त्यांना राजकारण नीट कळते, त्यामुळे ते पक्ष सोडून जाणार नाहीत’ असे व्यक्त केले आहे. जामनेर येथील कार्यक्रमाला खडसे उपस्थित नव्हते. मात्र खासदार सुनबाई व कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. खडसे यांच्याशी दिवसभरात कोणतीही चर्चा झाली नाही, असेही फडणवीसांनी यावेळी माध्यमांना सांगितले.