कोरोनामुळे जवळपास सर्वच गोष्टी ठप्प झाल्या होत्या. शाळा महाविद्यालये तसेच मंदिरेही बंद होती. शाळा, कॉलेज बंद असल्याने विद्यार्थ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होतं. शालेय विद्यार्थ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. राज्यात दिवाळी नंतर शाळा महाविद्यालये सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे.
९ वी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेण्यात येईल. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकार एक चांगले धोरण आखेल व ते आमलात आणेल असं राज्यमंत्री कडू म्हणाले. शाळा सुरू झाल्यानंतर कोणाही कोरोनाबाधित होणार नाही याची काळजी घेतली जाईल. ५० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या शिक्षकाच्या जागी नवीन शिक्षक देण्यात येईल असही कडू यांनी म्हटले आहे.