मोदींचे गुरु दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करत फिरत आहेत; म्हणून फडणवीस बाहेर निघाले : अब्दुल सत्तार

18

राज्यमंत्री अब्दुल सत्तार सध्या परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करत आहेत. दरम्यान त्यांनी एका वहिनीला प्रतिक्रिया देताना, देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात फिरण्यापेक्षा मोदींकडे जाऊन बसावे आणि आमचे हक्काचे जीएसटीचे पैसे द्यायला सांगावे. त्यामुळे आम्हाला तातडीने शेतकऱ्याला मदत करता येईल” असं राज्यमंत्री सत्तार म्हणाले.

“शरद पवार देशाचे नेते आहेत. शेतकऱ्यांवर कुठलंही संकट येतं तेव्हा ते भेटीला धावून जातात. सरकारला मदत करायला सांगतात. सरकारला दिशा देतात. त्यामुळेच नरेंद्र मोदी त्यांना गुरु मानतात. मोदींचे गुरु सध्या दुष्काळात फिरत आहेत. त्यामुळे फडणवीस पाहणी करण्यासाठी बाहेर निघाले” असा दावाही अब्दुल सत्तार यांनी केला आहे. त्याचबरोबर एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. आणि राहिल्यास अधिकाऱ्यांना निलंबित करू असं त्यांनी म्हटलं आहे.