मोदीजी हद्द झाली राव …… मोदींच्या त्या वक्तव्याची नाना पटोलेंनी उडविली खिल्ली

4

पंतप्रधान नरेंद्र मोदी बांग्लादेश दौर्‍यावर आहेत. यादरम्यान नरेंद्र मोदी यांनी बांग्लादेश स्वातंत्र्यलढ्यात आपन सहभागी होतो असे वक्तव्य केले होते. यावरुन आता कॉंग्रेसने मोदींना निशाना करण्यास सुरुवात केली आहे. नरेंद्र मोदी खोटे बोलतायत असा दावा कॉंग्रेसने केला आहे. तर भाजपकडून बचावाची भूमिका निभावली जात आहे. दरम्यान कॉंग्रेस प्रदेशध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधानांना खोचक टोला लगावला आहे.

मोदीजी अजून किती फेकणार, आमच्या मराठीमध्ये म्हणतात “हद्द झाली राव” अशीच नरेंद्र मोदींची अवस्था झाली असल्याचे नान पटोले म्हणाले आहेत. बांग्लादेश स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याचं भाग्य मला लाभलं होतं. तेव्हा २० – २२ वर्षांचा असेन, पाकिस्तानी सैन्यांकडून बांग्लादेशी नागरिकांवर होणारे अत्याचार बघून आम्ही अस्वस्थ व्हायचो असे नरेंद्र मोदी म्हणाले होते. यावरुनच कॉंग्रेसने मोदींना लक्ष्य केले आहे.

शेतकर्‍यांच्या आंदोलनाबाबत ब्र न काढणारे मोदीजी बांग्लादेशच्या स्वातंत्र्यसंग्रामातील आंदोलनात सहभागी होती. शेतकर्‍यांना आंदोलनजीवी संबोधून आपण त्यांची खिल्ली ऊडवली होती. मग आता तुम्ही कोण आहात? ढोंगीजिवी असे नाना पटोेले म्हणाले आहेत.

दरम्यान एका कॉंग्रेस कार्यकर्त्यांने थेट माहितीच्या अधिकाराखाली १९७१ ला मोदींना कुठल्या गुन्ह्याअंतर्गत अटक करण्यात आली होती आणि कुठल्या कारागृहात त्यांना ठेवण्यात आले होते. अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडे मागवण्यात आली आहे.