दरवर्षी शिवाजी पार्क मध्ये होणारा शिवसेनेचा दसरा मेळाव्याची परंपरा यंदा खंडित होणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेल्या दसरा मेळाव्याला विशेष महत्त्व आहे. पण, कोरोना संकटामुळे मेळावा होईल का ? असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून विचारला जात होता. त्याचं उत्तर आता मिळालेलं आहे. कोरोना मुळे शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर सभगृहात ५० लोकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. दरवर्षी शिवाजीपार्क मध्ये होणारा दसरा मेळावा यंदा त्याठिकाणी होणार नाही. सोशल डिस्टन्सिंग पाळून संध्याकाळी ७ वाजता हा मेळावा पार पडणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सायंकाळी 6.30 वाजता सहपरिवार शिवाजी पार्क येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला वंदन करतील. मग ठीक 7 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहातून त्यांच्या भाषणाला सुरुवात होईल. उद्धव ठाकरे या मेळाव्याला संबोधित करतील. त्यांच्यासह, शिवसेनेचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक आणि प्रमुख नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.