कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्रिमंडळातुन यशोमती ठाकूर यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी केली.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, न्यायालयाने तुरुंवसाची शिक्षा ठोठावली आहे, त्यानंतर नैतिक जबाबदारी म्हणुन यशोमती ठाकूर यांनी ता ताबडतोब मंत्रीपदाचा राजीनामा देणे आवश्यक होते, पण अजूनही त्या राजीनामा देत नाहीत. त्यांनी राजीनामा द्यावा. अशी भाजपची मागणी आहे. यशोमती ठाकूर स्वतःहून राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांची मंत्रिमंडळातुन हाकलपट्टी करणे गरजेचे आहे.
यशोमती ठाकूर यांचे म्हणणे आहे की, वरिष्ठ न्यायालयात त्यांना न्याय मिळेल. परंतु त्यांनी न्यायालयातुन निर्दोष ठरेपर्यंत मंत्रिमंडळापासून दुर राहणे आवश्यक आहे. यशोमती ठाकूर यांचे अजूनही मंत्रिपद कायम आहे, याचा भारतीय जनता पक्ष निषेध करते.