मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सत्तेत नसले तरी सामन्य मराठी माणसाला त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा लपून राहिलेल्या नाहीत. अनेक समस्या घेऊन लोक राज ठाकरे यांच्याकडे नेहमीच येत असतात. ५ आक्टोबर रोजीही अशीच महिलांची गर्दी राज ठाकरे यांचे निवासस्थान कृष्णकुंजच्या बाहेर पहायला मिळाली. मुंबईतील डोंगरी मासळी बाजाराबाहेर परप्रांतिय मासेविक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या अतिक्रमणाचा प्रश्न घेऊन या महिला आल्या होत्या. राज ठाकरे यांनी त्यांच्या समस्या ऐकून घेऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
मनसेच्या अधिकृत ट्विटर वरून यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. लोकडाऊनच्या काळात अडचणीत आलेल्या अनेक व्यवसायिकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यांच्या व्यवसाय करताना येणार्या अ़डचणींचा पाढा त्यांनी राज ठाकरे यांच्यासमोर वाचला होता. तसेच याबाबत आवाज उठवण्याची मागणी केली होती. राज ठाकरे यांनीदेखील मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याचं व प्रसंगी आंदोलन करण्याचं आवाहान केलं होतं.