अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे ही सोशल मीडिया वर सतत अपडेट असते त्याचे कारण म्हणजे तिचे बोल्ड पोस्ट. या अभिनेत्रीने नुकताच बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेशी लग्न केले. अभिनेत्रीने स्वत: ला सेटल करण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नानंतर आता काही दिवसातच पूनम पांडे यांनी तिच्या पतीकडून आपल्याला मारहाण होत असल्याचा आरोप केला आहे.
पूनमने तिच्या पतीवर अत्याचार आणि धमकी दिल्याचा आरोप केला आहे, त्यानंतर सॅमला गोव्यात अटक करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ही बाब सोमवारी रात्रीची आहे. दाखल केलेल्या तक्रारीनुसार पूनम पांडे दक्षिण गोव्यातील एका गावात चित्रपटाचे शूटिंग करत होती. त्यावेळी ही घटना घडली. कनकोना पोलिस ठाण्याचे निरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनमने तिच्या नवऱ्याने तिचा विनयभंग केला आणि तिच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय सॅमने तिला धमकावले असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली..