वादग्रस्त रियालिटी शो ‘बिग बॉस’ 14 अत्यंत गाजला आहे. शो मधील टास्क, केली जाणारी विधाने, सेलेब्रिटी स्पर्धक, त्यांचे खऱ्या आयुष्यातले वर्तन यामुळे नेहमी चर्चेचा विषय असतो. पण यावेळी हा शो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. प्रसिद्ध गायक कुमार सानु यांचा मुलगा जान सानु हा या शोमध्ये स्पर्धक आहे. त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या शो चर्चेत आहे.
अभिनेत्री निकी तंबोली जानसोबत हिंदी ऐवजी मराठीत संभाषण करत होती. त्यावेळी जान सानुने तिला मराठी बोलण्यापासून रोखले आणि मराठी भाषेवर टीका देखील केली. मला मराठी भाषा आवडत नाही, माझ्याशी मराठीत बोलू नकोस, मराठी भाषा ऐकल्यावर माझ्या डोक्यात तिडीक जाते असे वक्तव्य जान सानुने केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर बऱ्याच प्रमाणात व्हायरल झाला आहे. आणि मराठी भाषिक या वक्तव्यामुळे संतापले आहेत.
महेश टिळक यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मराठी भाषेची तुला लाज वाटते का? असा संताप व्यक्त करत जोरदार टीका केल्या आहेत. दरम्यान मनसेचे चित्रपट अध्यक्ष अमेय खोपकर यांनी जान कुमार सानुला धमकीवजा ईशारा दिला होता. आम्ही मराठी तुला लवकरचं थोबाडणार. मग तुला स्वतःची चीड येईल,ही गॅरंटी देतो अशा प्रकारे अमेय खोपकरांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनतर आता मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनीदेखील जान कुमार सानुला ईशारा दिला आहे. जान कुमार सानुच्या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे. त्याची ‘बिग बॉस’ मधून हक्कलपट्टी व्हावी अशी मागणीही करण्यात येत आहे. तसेच जान सानुची शो मधून हक्कलपट्टी न केल्यास सेट वर येऊन आंदोलन करेन, असा इशारा शिवसेना प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांनी कलर्स वाहिनीला दिला आहे.
मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या जान सानुला ‘बिग बॉस’ शो मधून हाकला अन्यथा शो चालू देणार नाही असा इशारा मनसे आणि शिवसेना दिला होता. यानंतर ‘कलर्स वाहिनीने’ या प्रकरणा बाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माफी मागितली आहे. पत्रात म्हंटल आहे की, कालच्या भागात मराठी भाषेबद्दल जो वादग्रस्त भाग प्रसारित झाला, तो आम्ही सर्व प्लॅटफॉर्म वरून डिलेत करत आहोत. महाराष्ट्रातील प्रेक्षक आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही सर्व भाषेचा सन्मान करतो असे या पत्रात म्हंटले आहे.