उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये 14 सप्टेंबर रोजी हृदयपिळवून टाकणारी घटना उघडकीस आली. सामूहिक बलात्कारानंतर 19 वर्षांच्या मुलीची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यावेळी ती बचावली व त्यानंतर दोन दिवसांनी ती जीवनाची लढाई हरली. या घटनेचा सर्व स्तरातुंन निषेध व्यक्त केला जात आहे. अशातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या घटनेवर संताप व्यक्त करत ही सर्व घटना अत्यंत क्लेशदायक, संतापजनक आणि लाजिरवाणी आहे. असं कृत्य करणारे नराधम समाजात आहेत हे सहन होण्यापलीकडे आहे. असं अमानुष कृत्य करणाऱ्यांना त्यांच्या कृत्यापेक्षाही जबर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.