कोरोना महामारीचं संकट मोठं असलं तरी इतर मुद्यांमुळे सामान्य जनतेचं लक्ष दुसरीकडे गेलं आहे. हाथरस येथे घडलेल्या घटनेचे पडसाद सगळीकडे उमटत आहेत. मात्र या सर्व घटमटीत जगात काय चालूय याकडे कोणाचच लक्ष नाहीये.
अमरबैजान आणि आणि अर्मेनिया या दोन देशात युध्द पेटलय. मागील चार दिवसांपासून दोन्ही देश एकमेकांना नुकसान पोहचवत आहेत. आतापर्यंत दोन्ही देशाचे मिळून 100 च्या वर लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. दोन्ही देशाच्या सेना नागोर्नो- कारेबाख या विवादित क्षेत्रासाठी एकमेकांच्या विरोधात आमने सामने आहेत.
सुपर पावर समजली जाणारी अमेरिका या प्रकरणात हस्तक्षेप करायला तयार नाहीये. दोन्ही देशांना शांतता राखण्याचे आवाहन अमेरिकेने केले मात्र दोन्ही देश शांतता चर्चा करण्यास तयार नसल्याने परिस्थिती हाताबाहेर जात आहे. टर्की या देशाने अमरबैजान ची बाजू घेतल्याने रशिया अर्मेनियाच्या बाजूने उभा राहण्याची शक्यता आहे. यामुळे युद्धाचा भडका आणखी वाढू शकतो यामुळे आंतरराष्ट्रीय समुदाय चिंतेत आहे. अर्मेनियाच्या पंतप्रधानांनी शांतता चर्चेस स्पष्टपणे नकार दिल्याने युध्दाचा भडका आणखी उडण्याची शक्यता आहे.