योगी सरकारची मोठी कारवाई, हाथरस प्रकरणात एसपी, डीएसपी निलंबित

9

टीम वर्तमान  | हाथरस घटनेत योगी सरकारने मोठी कारवाई केली आहे. एसपी, डीएसपी आणि हाथरसचे पोलीस निरीक्षक यांना अटक केली आहे. तिघांना निलंबित करण्यात आले आहे. प्रत्येकासाठी नार्को पॉलीग्राफ चाचणी देखील घेण्यात येईल. यात पीडितेचे कुटुंबही आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्राथमिक चौकशी अहवालाच्या आधारे विद्यमान एसपी, डीएसपी, इन्स्पेक्टर आणि इतर काहींवर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

चांदपा पोलीस ठाण्याचे सर्व पोलिस, फिर्यादी व प्रतिवादी यांचे पॉलीग्राफी चाचणी घेण्यात येणार आहे. एसपी विक्रांत वीर, सीओ राम शब्द, निरीक्षक दिनेश कुमार वर्मा, एसआय जगवीर सिंग अशी निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.