योगी सरकार नरमले अखेर केली कारवाई

19

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे तरुणीसोबत झालेल्या दुर्दैवी घटनेने देश हादरला आहे. हाथरस येथील पीडितेचा मंगळवारी दुर्दैवी मृत्यू झाल्याने देशातून संताप व्यक्त केला जात आहे. देशभरातून उत्तर प्रदेश सरकार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टीका होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस पक्ष आक्रमक भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळतंय. उत्तर प्रदेशात सध्या तणावाचं वातावरण असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हाथरस प्रकरणात योगी सरकारने मोठी कारवाई केली आहे. एसपी, डीएसपी आणि इन्स्पेक्टर यांना निलंबित केले आहे. तसेच पीडितेच्या कुटुंबियांसह पोलिसांचीही नार्को पॉलिग्राफी टेस्ट करण्यात येणार आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

दरम्यान, युपी सरकारने स्थापन केलेल्या SIT अहवालानुसार हाथरसचे जिल्हा पोलीस प्रमुख विक्रांत वीर, पोलीस उपअधीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांवर निलंबन कारवाई झाली आहे. हाथरस पोलीस ठाण्यातील सर्व पोलिसांची आता नार्को पॉलिग्राफ टेस्ट सुद्धा केली जाणार आहे. त्याबरोबरच, पीडित मुलीच्या कुटुंबियांचीही नार्को पॉलिग्राफ टेस्ट केली जाणार आहे.