देशभरात उद्भवलेली कोरोना परिस्थिती सर्वांच्याच चिंतेचा विषय आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. तसेच अनेक उद्योग-व्यवसाय अडचणित आले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हळूहळू राज्य अनलॉक करत आहेत. मात्र, अजूनही राज्यातील धार्मीक स्थळे बंद असल्याने भाजपाने आक्रमक पवित्रा घेतल्याचे पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी भाजपाने यासाठी आंदोलन देखील छेडले आहे.याच मद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अडचणित आणण्याचा राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचा प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हाणून पाडला आहे.
राज्यतील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. हळूहळू सर्व सेवा पूर्ववत होत आहेत. धार्मिक स्थददळंही लवकरच सुरू होतील. मात्र आमचे हिंदूत्व सिद्ध करण्यासाठी आम्हाला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्यपाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना पत्र पाठवल्याच्या कृतीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार देखील नाराज झाले असून यासंबंधी त्यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहले आहे.
सोशल मिडीयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालाना दिलेल्या प्रत्यूत्तराची खमंग चर्चा होत असून राज्यपालानी राजकिय भुमिका घ्यायला नको असाही सुर उमटत आहे.