राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा १० हजार कोटींची मदत जाहीर

24

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून अतिवृष्टी होत असल्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्यांचे खूप नुकसान झाले आहे. मागच्या काही दिवसांपासून सर्वपक्षीय नेते पाहणी दौरे करत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दौरा केला होता.

आज महा विकास आघाडी सरकारची त्यासंबंधी बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पार पडली. आणि उद्धव ठाकरेंनी १० हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचे जाहीर केले आहे. जिरायत आणि आणि बागायत क्षेत्रासाठी १० हजार रुपये प्रती हेक्टर आणि फळबाग क्षेत्रासाठी २५ हजार रुपये प्रती हेक्टर प्रमाणे मदत जाहीर झाली आहे.