राज्य सरकारकडुन अनलॉक 6 च्या गाईडलाईन्स जारी झाल्या आहेत. 30 नोव्हेंम्बर पर्यंत मुदतवाढ देखील करण्यात आली आहे. याआधी केंद्रीय गृह मंत्रालयाने अनलॉक 6 साठी मार्गदर्शन तत्वे जाहीर केली आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या गाईडलाईन्स नुसार, कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाउन 30 नोव्हेंम्बर पर्यंत सुरू राहणार आहे. अनेक गोष्टींना नियम व अटींनुसार संमती देण्यात येणार आहे. मात्र कोरोना प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाउन कायम असणार, असेही गृहमंत्रालयाने म्हंटले आहे.
एका राज्यातून दुसऱ्या राज्यात व्यक्ती किंवा वाहनांना जाण्यास परवानगी आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्याची आवश्यकता लागणार नाही. हॉटेल, रेस्टॉरंट सुरू करण्यात आले आहेत. सोशल डिस्टंसिंग पाळणे आणि मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. मेट्रो सेवा देखील सुरू करण्यात आली आहे. परंतु शाळा व महाविद्यालयांचा निर्णय अद्याप घेतला गेला नाही.
कोविडचे नियम पाळून 100 लोकांच्या उपस्थित सार्वजनिक कार्यक्रम सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अनलॉक 5 मध्ये थिएटर, शाळा, राजकीय सभा, धार्मिक कार्यक्रम आणि इतर कार्यक्रमांना अटिसह सूट देण्यात आली आहे. यादरम्यान स्विमिंग पूल बंद राहणार आहेत. मात्र कंटेनमेंट झोनमध्ये कडक लॉकडाउन ठेवण्यात येणार आहे. जारी केलेल्या मार्गदर्शन तत्त्वानुसार गृह मंत्रालयाने परवानगी दिलेल्या काही गोष्टी सुरू राहतील.