महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास मनसे नेते अमित ठाकरे यांना वांद्रे येथील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
ताप असल्या मुळे त्यांना रुग्णालयात दाखल केलं असल्याचं सांगितलं जातंय, काळजी करण्याचं कारण नाही असं डॉक्टरांनी सांगितले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमित ठाकरे यांची कोविड चाचणी करण्यात आली असून ती निगेटिव्ह आली आहे. याशिवाय, त्यांचा मलेरिया चाचणीचा अहवालही निगेटिव्ह आला आहे.
राज ठाकरे यांनी अमित यांची लीलावतीत जाऊन भेट घेतली. मुलाच्या आजारपणामुळे राज ठाकरे यांच्यातील हळव्या बापाचं दर्शन मनसैनिकांना झालं आहे.