राज ठाकरेंनी राज्यपालांची भेट घेणे; हा तर महाराष्ट्राचा अपमान : शिवसेना नेते संजय राऊत

11

महाराष्ट्राच्या संदर्भातील प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटेन हा तर महाराष्ट्राचा घोर अपमान आहे. त्यांनी संबंधित मंत्री, तसेच मुख्यमंत्र्यांना भेटायला हवे. अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर केली. वीज बिलाचा प्रश्नांवरून राज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यावेळी राज्यपालांची शरद पवारांची भेट घ्यावी आसं राज ठाकरेंना सुचवले होते. यावरून संजय राऊत पुण्यातील पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

त्यांनी शनिवारी पुण्यातील पत्रकारांशी वार्तालाप केला. राज्यपालांना कार्यकारी अधिकारी नसतात त्यामुळे राज ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांना भेटावे. तसेच राज्यपालांनी अशा कारणांसाठी भेटी देऊन नयेत असेही ते म्हणाले. पवार राज्य चालवतात अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली होती. त्याला प्रतिउत्तर देताना त्यांनी सरकार तीन पक्षांचं आहे व अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शन घेतल्यास काय बिघडलं ? असा प्रतिप्रश्न केला.