महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. राज्यपाल कोश्यारी यांचे निवासस्थानी राजभवन येथे ही भेट होणार आहे. भेटीचं कारणं अद्याप गुलदस्त्यातच आहे. लोकहिताच्या प्रश्नांसाठी राज ठाकरे राज्यपालांना भेटणार असल्याची सध्या माहिती आहे. राज ठाकरे मायक्रोफायनान्स कंपन्यांचा मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी राज्यपालांना भेटणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यपालांच्या भेटीआधी राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. राज ठाकरेंसोबत बैठकीसाठी मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश जाधव, शिरीष सावंत, रिटा गुप्ता आणि इतर पदाधिकारी कृष्णकुंजवर दाखल झाले आहे. राज्यपाल भेटीपूर्वी सकाळी 9 वाजता काही ठराविक पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंनी कृष्णकुंजवर बैठकीसाठी बोलवले होते.