राज्यात कोरोनाची परिस्थिती आणि कोरोनाबधित रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढली आहे. मुंबईमधील गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या घटनांमुळे राज्य सरकार अपयशी ठरत आहे. असा आरोप सरकारवर करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी याचिका दाखल करण्यात आली आहे. ठाकरेंच सरकार महाराष्ट्रात बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठाने 16 ऑक्टोम्बरला ही याचिका फेटाळून लावली. घटनेच्या कलम 352 चा आधार घेत कोर्टाने यात हस्तक्षेप करावा असे याचिका दाखल करणाऱ्यांचे म्हणणे होते. पण खंडपीठाने ही याचिका सुनावणीस नकार दिला. तसेच, ‘तुम्हाला माहीत तरी आहे का? महाराष्ट्र किती मोठे राज्य आहे? असं म्हणत बोबडे यांनी याचिकाकर्त्यांना फटकारून काढले त्यांची कानउघाडणी केली.