राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीचे औरंगाबादमध्ये पडसाद

17

काॅग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना उत्तरप्रदेशात धक्काबुक्की करण्यात आली. उत्तरप्रदेशातील हाथरस येथे एका युवतीवर चार नराधमांना बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली होती. बलात्कार पिडीतेला भेटण्यासाठी राहुल गांधी हाथरसला जाय होते. मात्र मध्येच पोलिसांनी त्यांना अडवले. पोलिस व राहुल गांधी यांच्यात बाचाबाची झाली.या घटनेचे पडसाद आता राज्यात उमटत असून ठिकठिकाणी कांग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे.

औरंगाबाद शहरातही या घटनेचे पडसद उमटले असून कॉंग्रेसचे आमदार डॉ कल्याण काळे यांच्या सुचनेनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, मुकुदंवाडी येथे निषेध नोंदवण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक मोहननाना साळवे, नगरसेवक बाळुशेठ गुजर्र, अशोक आण्णा डोळस, संजय पा जगताप, प्रकाश सानप, सुभाष पाडंभरे पा, मलके काका, मगरे अंकल,अनिल पा जगताप,अंनद डोळस, गंगावणे साहेब, शेंडगे साहेब, रवींद्र मुळे,सुलतान शहा,कांता रणभरे, शरद म्हस्के, युनुस भाई,भाऊसाहेब भोळे, रितेश मलके,अजय गांधीले, राजु शिंदे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.