सुशांत सिंग राजपूत प्रकरणात चर्चेत असलेली रिया चक्रवर्ती हिला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. याच प्रकरणात ड्रग्स कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आलं होतं. ड्रग्स खरेदी केल्याच्या आरोपाखाली रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती आणि अन्य 18 आरोपींची आज न्यायालयीन कोठडी संपणार होती. मात्र, याप्रकरणी मंगळवारच्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने रिया आणि शौविक चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीत 20 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली होती. त्यानंतर मात्र, आज न्यायालयाने रियाला सशर्त जामीन मंजूर केला आहे. तसेच शौविकचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
रियाचा जमीन मंजूर झाल्यामुळे पुढच्या काही तासांमध्ये रियाची भायखळा जेलमधून सुटका होणार आहे. मात्र, जेलमधून बाहेर आल्यानंतर रिया चक्रवर्ती हीची गाडी कोणीही फॉलो करू नये, असे आदेश मुंबई पोलिसांनी दिलेत. तिची गाडी फॉलो केल्यास कारवाई करू, असा दम मुंबई पोलिसांनी दिला आहे. आधी सुद्धा मुंबई पोलिसांनी मिडीयाला मोठा इशारा दिला होता. माध्यमांनी कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होईल असं वर्तन करू नये, असं सुद्धा मुंबई पोलिसांनी ठणकावलं आहे.