रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरगूती उपाय करताय तर सावधान!

20

कोरोनाचा वाढता धोका टाळण्यासाठी रोगप्रतीकारशक्ती वाढवण्यावर भर दिला जात आहे. यासाठी घरगूती उपायांचा वापर केला जात असून आयूर्वेदाचा सहारा घेतला जात आहे. मात्र असे करत असताना आपल्याकडून गल्लत होते. जर आयूर्वेदिक औषधी योग्य प्रमाणात घेतल्या गेल्या नाहित तर त्यांच्या आपल्या शरिरावर दुष्परिणाम देखील होऊ शकतो म्हणून घरगूती उपचार करताना काळजी घेणे कधीही योग्य.

हळद : हळद ही त्वचेसाठी तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. हल्दी पावडरपेक्षा कच्च्या हळदीचे फायदे अधिक आहेत. हळदीला मिर्यांसोबत घेतल्यास खूप फायदे होतात. जर तुम्ही हळदीचे मिस्रण घेत असाल तर अर्ध्या चमच्यापेक्षा जास्त हळद घेऊ नका.

अद्रक: ताजं आलं पोटातील बैक्टेरीयांना स्थिर करून आपली पचनव्यवस्था ठीक करते. तर सुकलेलं आलं फुप्फुसांवर प्रभावशाली आहे. जास्त फायद्यांसाठी तुम्ही लिंबू अद्रकचे ज्यूस घेऊ शकता. मात्र दोन चमच्यांपेक्षा जास्त आल्याचा रस घेऊ नका.

मिरे : मिर्यांमध्ये असलेल्या पेपाराईन नावाच्या घटकामुळे फप्फुसांची क्रियाशीलता वाढते. तसेच रोगप्रतीकारशक्ती वाढवण्यासाठी मिरे अतिशय उपयुक्त आहेत. मात्र यांच्या अतिसेवनाने गंभीर दुष्मरिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे दिवसभरात चार ग्रामपेक्षा कमीच मिऱ्याचे सेवन करावे.

लसूण : लसणाणामध्ये एलिसिन, डिस्लफेट आणि थायोसल्फेट आढळते. ज्यामुळे फप्फुसांचे सूक्ष्म जीवांपासून संरक्षण होते. लसणाला माशांबरोबर खाणे जास्त फायदेशीर असते. मात्र एका दिवसांत सात ग्रामपेक्षा जास्त लसूण खाऊ नये.