रोमांचक सामन्याच्या ‘सुपर ओव्हर’ मध्ये दिल्लीचा सहज विजय

41

आयपीएल २०२० हंगाम संयुक्त अरब अमिरात मध्येनुकतीच सुरु झाला आहे. दिल्ली आणि पंजाबमधला पहिलाच सामना या हंगामाचा अगदी दुसराच सामना अतिशय रंगतदार झाला दिल्ली संघाने प्रथम फलंदाजी करत १५७ धावा केल्या. सुरुवात अतिशय सुमार झाली असतानाही कर्णधार श्रेयस अय्यरच्या झुंजार ३९ (३२) धावांची खेळी आणि मार्कस स्टोयनिसच्या धमाकेदार ५३ (२१) धावांच्या खेळीनंतर दिल्लीला तिथपर्यंत मजल मारता आली. पंजाबकडून भेदक मारा करत मोहम्मद शामिने ३ बळी घेतले.

विजयासाठी १५८ धावांचा पाठलाग करताना के.एल राहुलच्या पंजाब संघाची अवस्थाही खूप दयनीय झाली होती. सर्व प्रमुख फलंदाज लवकरच माघारी परतले होते. सलामीला आलेल्या मयंक अग्रवालच्या संयमी आणि तेवढ्याच आक्रमक ८९ (६०) धावांच्या खेळीने पंजाबला विजयासमीप नेऊन सोडले मयंक बाद झाल्यांनतर पंजाबला सामना जिंकता आला नाही सामना बरोबरीत सुटला.

सुपर ओव्हर मध्ये पंजाब संघाला कंगीसो रबाडाच्या भेदक गोलंदाजीने २ बळी घेवून केवळ २ धावांवर रोखले आणि दिल्लीने सामना सहजरित्या जिंकला धमाकेदार अष्टपैलू कामगिरी करणारा दिल्लीचा मार्कस स्टोयनिस ठरला सामनावीर