‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

22

अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’ सिनेमाचा ट्रेलर सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. ‘बरसने आ रही लक्ष्मी, अशा डायलॉगसह अभिनेता अक्षय कुमारची फिल्म ‘लक्ष्मी बॉम्ब’ चा ट्रेलर रिलीज झाला आहे. अनेक चित्रपटांमध्ये अक्षय कुमारने वेगवेगळ्या भूमिका साकारताना पाहिल्या आहेत. पहिल्यांदाच एका ट्रान्सजेंडरची भूमिका या चित्रपटात साकारत आहे.

अक्षयच्या भूमिकेच नाव लक्ष्मी आहे. या ट्रेलर मध्ये अनोखा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राघव लॉरेंस यांनी केलं आहे. अक्षय कुमार, कियारा अडवाणीसोबत सिनेमात शरद केळकर, तरुण अरोरा, अश्विनी काळसेकर, मीर सरंवर, बाबु एंटोनी आणि तुषार कपूर यांच्याही महत्वाच्या भूमिका असणार आहेत. या सिनेमाचं काम करण्यासाठी कलाकारांनी जास्त प्रमाणात मानधन घेतलं असल्याची माहिती मिळत आहे.


हा चित्रपट ‘कंचना’ या तमिळ सिनेमाचा रिमेक आहे. कंचना हा सिनेमा राघव लॉरेंस यांनी लिहला, दिग्दर्शित केला आणि भूमिकाही साकारली होती. ९ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. हॉट स्टारवर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारत, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यूएईमध्ये प्रदर्शित होतोय. चाहत्यांना या फिल्मची प्रतिक्षा होती. लवकर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.