मी तुझ्यावर प्रेम केले आणि तू लग्नास का नकार देते. असं म्हणून एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला मारहाण केल्याची घटना कल्याण मध्ये घडली. घटना घडल्यानंतर अवघ्या दोन तासात सदरील प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. तरुणीला मारहाण करणाऱ्या प्रियकराने नाव अजित कनोजिया असे आहे. कल्याण मधील कचोरे भागातील तरुणी कल्याण पश्चिम भागात मॉल मध्ये कामाला आहे. मॉल मधील काम आटोपून खाली आल्यानंतर तिथे तिच्या प्रियकराने येऊन हुज्जत घातली. त्यानंतर वाद होऊन भर रस्त्यात त्या तरुणीला त्याने मारहाण केली. त्या प्रियकराला पकडण्याचा प्रयत्न रस्त्यावरील लोकांनी केली असता, तो तेथून सही सलामत पळून गेला.
सदरील प्रियकराने लग्न झालेले असून, विवाहित असताना देखील त्याचे तरूनीसोबत प्रेम संबंध होते. दहाच दिवसापूर्वी त्याने प्रेयसी साठी पत्नीला सोडलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पत्नीला सोडल्यानंतर त्याने प्रेयसीला लग्नाची गळ घातली. तरुणीने लग्नासाठी नकार दिला होता. शुक्रवारी याच विषयावर त्यांचा वाद झाला. आणि त्याने तिला मारहाण केली.