लालकृष्ण आडवाणी यांच्यासह ‘या’ भाजपा नेत्याची बाबरी प्रकरणात निर्दोष मुक्तता

13

ऐतिहासिक दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या बाबरी विध्वंस प्रकरणाचा निकाल आज सीबीआय न्यायालयाने दिला. बाबरी प्रकरणात आरोपी असलेले भाजपा नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरलीमनोहर जोशी यांच्यासह ३० आरोपींची सीबीआय न्यायलयाने निर्दोष मुक्तता केली. भाजपा नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केली आहे.

MIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी मात्र या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. हिंसाचार केल्यास न्याय मिळतो, असा संदेश देणारा निकाल सीबीआयच्या न्यायालयानं दिल्याचं ओवेसी म्हणाले. ‘लालकृष्ण आडवाणींनी रथयात्रा काढली. त्यावेळी हिंसाचार झाला. जाळपोळ झाली. घरं पेटवून देण्यात आली. कुटुंब उद्ध्वस्त झाली. एक धक्का ओर दौ, बाबरी मशीद तोड दो, अशा घोषणा उमा भारतींनी दिल्या होत्या. मशीद पाडल्यानंतर लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशींनी मिठाई वाटली होती. त्यांनी राजकीय लाभासाठी मशीद पाडली. पुढे यातूनच त्यांना सत्ता मिळाली आणि याच सगळ्यांची आज निर्दोष मुक्तता झाली,’ असं ओवेसी म्हणाले.

काय आहे बाबरी प्रकरण

देशातील सर्वात जास्त काळ चाललेल्या खटल्यामधील राम मंदिराचं प्रकरण एक आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर बांधण्यास परवानगी दिली आहे. देशातील सर्वात जास्त काळ चाललेल्या खटल्यामधील राम मंदिराचं प्रकरण एक आहे. . मागील महिन्यात त्याचा भूमीपूजनाचा कार्यक्रमही झाला आहे.