‘लाव रे तो व्हिडीओ’ फडणवीसांचा ठाकरेंना सणसणीत टोला

9

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस 19 ऑक्टोम्बर उस्मानाबादेत अतिवृष्टीमुळे झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मुद्दयावरून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केल्या. महाराष्ट्रभर कोरोनाचे संकट असताना महाराष्ट्रावर ओल्या दुष्काळाचे संकट कोसळले आहे.

उस्मानाबाद इथे झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या स्टायलची कॉपी करत ‘लाव रे तो व्हिडीओ’ हा प्रयोग केला. या वेळी सत्तेत येण्याआधी उध्दव ठाकरे आणि अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काय मागणी केली होती, त्याबद्दलचा जुना व्हिडीओ दाखवला आहे. कोरडवाहु शेतीसाठी हेक्टरी 25 हजार रुपये आणि बागायतीसाठी 50 हजार रूपये हेक्टरिची मदतीची मागणी केली होती. या दोन्ही नेत्यांचे जुने व्हिडीओ काढून राज्य सरकारला शेतकऱ्यांना त्यांची मदत करण्याची नेमकी काय भूमिका होती यांची आठवण फडणवीसांनी करून दिली.

राज्यात कोणतेही संकट आले की नेहमी केंद्राकडे बोट दाखवले जाते. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच फोन करून मुख्यमंत्रांकडून माहिती जाणून घेतली आणि मदतीचे आश्वासन दिले. केंद्र सरकारची मदत कधी येते हे शरद पवारांना देखील माहिती आहे. केंद्राच्या समितीचे प्रमुख हे गृहमंत्री आणि अर्थमंत्री असतात. केंद्राकडून एनडीआरएफसाठी निधी देतात त्याचा वापर करता येतो त्यामुळे राज्य सरकारने करणे ना देता तातडीने मदत करायला हवी अशी मागणी फडणवीसांनी केली.