लेकीचे लग्न १५ दिवसांवर; शेतकरी बापाचे जीवन संपवले

8

स्वतःच्या मुलीचे लग्न १५ दिवसांवर येऊन ठेपले असताना, शेतातील उभ्या पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकासन झाल्याने निराश झालेल्या शेतकरी पित्याने आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली. लग्नाचा खर्च कसा भागवायचा या विवंचनेतून हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यामधील सुकली येथील शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलले. शुक्रवारी संध्याकाळी नैराश्येतून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.

शेतकरी समदानी कुरेशी वय (५०) यांची ३ ऐकर शेती आहे. शेतात सोयाबीन, कापूस, लागवड करण्यात आली होती. मात्र, अवकाळी पावसामुळे पिकाच नुकसान झालं आहे. त्यातच १५ दिवसांवर स्वतःच्या मुलीचे लग्न असल्याने आता पैसे कुठून गोळा करू या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली. गावालगत असलेल्या तळ्यात उडी मारून त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुले असा मोठा परिवार आहे.