आज सकाळपासून माध्यम जगतात लेखिका शोभा देेशपांडे यांच्या आंदोलनाची चर्चा आहे. मराठी अस्मीतेवरून या आंदोलनाला सुरूवात झाली. त्याचे झाले असे लेखिका देशपांडे गूरूवारी ४ वाजेच्या दरम्यान मुंबईमधील कुलाब्यातील महावीर नावाच्या सराफा दुकानात गेल्या मात्र त्यावेळी त्यांना हिंदी भाषेत प्रत्यूत्तर मिळाले. मराठी भाषिक राज्यात मराठीच बोलावी असा आग्रह त्यांनी दुकानामधील कर्मचाऱ्याला धरला. तेव्हा मात्र त्या कर्मचार्याने अरेरावीची भाषा वापरत मराठी बोलण्यास स्पष्ट नकार दिला.
त्यानंतर त्यांनी त्याच दुकानासमोर आंदोलन सुरू केले. याबाबत माहिती मिळताच मनसे व शिवसेना कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. मनसे नेते संदिप देशपांडे यांनीही त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र दुकानदाराने दुकानाचा परवाना दाखवावा या मागणावर त्या ठाम होत्या. अखेर पोलिसांनी त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तसेच दुकानमालकाने देखील मराठीत माफी मागितल्यानंतर त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.