भजनसम्राट अनुप जलोटा आणि अभिनेत्री, गायिका जसलीन मथारू यांची जोडी ‘बिग बॉस’ 12 सिझन मध्ये जोरदार चर्चेत होती. दोघांच्या बद्दल सोशल मीडियावर चर्चेला उधाण आल होत. दोघेही पार्टनर म्हणून या सिझन मध्ये दाखवले होते. त्यांची लव्ह स्टोरी चांगलीच गाजली होती
.
जसलीनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर अनुप जलोटा यांच्यासोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहून नेटकऱ्यांना दोघांनी लग्न केले की काय असाच प्रश्न पडला आहे. फोटोच्या कॅपशनमध्ये जसलीनने फक्त अनुप यांना टॅग केल्यामुळे या दोघांच्या लग्नाच्या चर्चां सुरू आहेत. या फोटोमध्ये जसलीन गुलाबी रंगाचा लेहंगा व दागिने घातलेले दिसत आहेत. भजनसम्राट अनुप जलोटा हे तिच्या बाजूला शेरवानी, शाल आणि पगडी या वेशभूषेत पहायला मिळत आहेत. चाहत्यांनी यावर प्रश्नांचा भडीमार केला आहे. यांनी गुपचूप लग्न केले नाही ना? असा प्रश्न उपस्थित केलाय.
‘बिग बॉस’ 12च्या घरात अनुप जलोटा यांनी आमच्या दोघांमध्ये गुरू शिष्याचं नात आहे अशी कबुली दिली होती. त्यांची वैयक्तिक आयुष्यात तीन लग्न झाली आहेत. परंतु तिनही लग्न यशस्वी नाहीत. दोघांचे फोटो जसलीनने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. त्यावर चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत परंतु हा पब्लिक स्टंट असल्याचं देखील म्हटलं जातं आहे.