आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे नेहमी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री मंदिरा बेदी ने एक कौतुकास्पद कार्य केले आहे. तिने वयाच्या 48व्या वर्षी आई होण्याचा निर्णय घेतला आहे. तीने बाळाला जन्म न देता एक मुलगी दत्तक घेतली आहे तिने सोशल मीडियावर पोस्ट टाकत ही बातमी दिली. 28 जुलै 2020 रोजी या नवीन पाहुण्यांचे घरी आगमन झाले आहे. परंतु दसऱ्याच्या मुहूर्तावर तिने ही बातमी शेअर केली.
मंदिरा आणि राज यांनी त्यांच्या मुलीचे नाव तारा बेदी कौशल ठेवलं आहे. ही बातमी चाहत्यांना देत तिन फोटोही शेअर केले आहेत. मंदिराने मुलीची ओळख करून देताना “तारा आमच्यासाठी प्रार्थना बनून आली आहे. आमची चिमुकली तारा असे लिहले आहे. आमची चिमुकली तारा” असे लिहले आहे. मंदिराचा मुलगा वीरने तीचे मोठ्या मनाने आणि उत्सुकतेने तिचे स्वागत केले आहे.
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ताराची ओळख करून देताना तिने अखेर आमचं कुटुंब पूर्ण झालं. “हम दो हमारे दो” असे सांगितले. ही बातमी ऐकताच चाहते व सेलेब्रिटी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.