भारतातील सर्वात सुंदर पुरुष असे मिलिंद सोमण यांनी नाव एकेकाळी मिळवले होते. आपल्या तारुण्यात मिलिंद सोमण यांनी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रोडक्टसाठी मॉडेलिंग केलं आहे. बॉलीवूड अभिनेता मिलिंद सोमण आता नव्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. त्यांनी वयाच्या 55व्या वर्षी वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा केला आहे. त्यांच्या फिटनेसचे अनेक चाहते आहेत. या वयातही ते स्वतःला इतकं फिट ठेवतात असा प्रश्न नेहमी सर्वांना पडलेला असतो. दरम्यान त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्याने फिटनेस आणि रनिंगचे महत्त्व पटवून देणारी पोस्ट शेअर केली आहे.
मिलिंदने वाढदिवसादिवशी स्वतःला इन्स्टाग्रामवर शुभेच्छा देत एक झकास फोटोही अपलोड केला आहे. या फोटोत तो समुद्रकिनारी धावत आहे. या फोटोत मिलिंदच्या अंगावर एकही कपडा नाहीये. त्याला ‘न्युड रन’ असंही म्हंटल जातं. मिलिंद यांच्या पत्नीने हा फोटो काढला आहे. तिने हा फोटो शेअर करत मिलिंदला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान अभिनेत्री तथा मॉडेल पूनम पांडे यांचा पॉर्न व्हिडीओ दोन दिवसापूर्वीच व्हायरल झाला. त्यांनंतर बुधवारी एक नवा प्रकार घडला आहे. या फोटोवरून भाजपवर निशाना साधून सरकार गोव्याला ‘पॉर्न डेस्टिनेशन’ म्हणून प्रोत्साहन देत आहेत असा आरोप चोडणकर यांनी केला. पूनम पांडेच्या व्हायरल झालेल्या फोटोंची तुलना मिलिंद सोमणच्या फोटोशी केली जात आहे.