ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना सध्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे ट्रोल होत आहेत. नुकतंच त्यांनी ‘द कपिल शर्मा’ या शोवर टिका केली होती. त्यांनी नेपोटीझमबाबत देखील वक्तव्य केलं होतं. आणि आता त्यांनी मीटूबाबत (MeToo) वक्तव्य केलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मुकेश खन्नाने महिलांनी घराबाहेर निघून काम करण्यावर आक्षेप जाहीर केला आहे. त्यांचं असं मत आहे, महिलांचं घराबाहेर पडणं हेच समस्येचं मूळ आहे. या वक्तव्यामध्ये त्यांनी मीटुचा संदर्भ घेतला आहे. ही मीटुची समस्या सुरू तेव्हा झाली जेव्हा महिलांनी घराबाहेर निघून काम सुरू केले. त्यांना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करायची इच्छा आहे. पण या सर्वात जास्त समस्या ही त्या मुलाची होते ज्याला आईपासून दूर राहावं लागतं. त्याला आयासोबत राहावं लागतं. व्हिडीओमध्ये मुकेश खन्नाचे मत आहे की, पुरुष हा पुरुष असतो आणि महिला या महिला असतात.
सोशल मिडियावर हे व्हायरल होत आहे. काही लोकांनी त्यांना वाईट भाषा वापरत ट्रोल देखील केले आहे. या व्हिडिओमध्ये काम करणाऱ्या महिलांवर बोलण्यात आलं आहे. सोशल मिडियावर याबाबत जोरदार टिका होत आहेत. काही युझर्सनी शक्तिमान नसून किलविश असल्याचं म्हंटल आहे. ‘मी टु’ प्रकरणात भाष्य करणारा अभिनेता मुकेश खन्ना यांनी महिलांना चुकीचे ठरवल्याचे दिसून येते.