विद्यार्थ्यांना दिलासा! दूरदर्शनवरून मिळणार शिक्षणाचे धडे

3

करोना नावाचा रोग जगभर पसरला आणि सगळेच चक्रे मंदावली. शाळा महाविद्यालयं बंद आहेत. विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. विद्यार्थ्यांच झालेलं शैक्षणिक नुकसान जरी भरून काढता येत नसलं तरी शाळा महाविद्यालयं लवकर सुरू व्हावेत यासाठी राज्य सरकर पाऊले उचलत आहे. त्याचाच एक भाग म्हणून 26 आक्टोबरपासून सह्याद्री वाहिनीवर ज्ञानगंगा या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात येणार आहे.

इयत्ता 9वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम असणार आहे. ट्विटवरून त्याबद्दलची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. “राज्यातील इ. 9 वी ते इ.12 वी तील विद्यार्थ्यांसाठी दि. 26 ऑक्टोबर 2020 पासून डी. डी. सह्याद्री वाहिनीवर ज्ञानगंगा या शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रसारण सुरू करण्यात येत आहे.” असं त्यानी आपल्या ट्विटसंदेशात म्हटलं आहे.

दरम्यान, अनेक दिवसांपासून शाळा महाविद्यालयं बंद असल्याने ती लवकर सुरू करावी यासाठी राज्यातील विरोधी पक्ष सरकारवर दबाव टाकत आहे. शिक्षण मत्री वर्षा गायकवाड यांनी ज्ञानगंगा या कार्यक्रमाचे दूरदर्शनवर प्रसारण करून एकप्रकारे विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. यानंतर राज्यातील विरोधी पक्षाच्या भूमिकेकडे सगळ्यांचेच लक्ष असणार आहे.