विधान परिषदेच्या १२ जागांसाठी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याकडे इच्छुकांची मोठी रांग आहे. राज्यपाल नियुक्त १२ विधान परिषदेच्या जागांबाबत महाविकास आघाडी १२ नावांच्या यादीवर गुरुवारी मंत्रिमंडळात चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. १२ नावांच्या शिफारशीची यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या मंत्रिमंडळाकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवण्यात येईल. त्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी, आणि काँग्रेस पक्षातील काही नावांची चर्चा होतेय. पक्षणीहाय नावे पुढीलप्रमाणे…
शिवसेना :
मिलिंद नार्वेकर,
माजी मंत्री सचिन अहिर,
माजी आमदार सुनील शिंदे,
युवा सेनेचे राहुल कनाल,
विजय करंजीकर,
भाऊसाहेब चौधरी,
नितीन बानगुडे पाटील
माजी मंत्री अर्जुन खोतकर
राष्ट्रवादी :
एकनाथ खडसे,
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी,
उत्तमराव जानकर,
शिवाजीराव गर्जे,
आदिती नलावडे,
गायक आनंद शिंदे,
श्रीराम शेटगे
काँग्रेस :
सचिन सावंत,
युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे,
माजी आमदार मोहन जोशी,
माजी मंत्री नसीम खान
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर