कधीही न थांबणारी मुंबई कोरोनामुळे चक्क थांबली होती. आता कुठेतरी मुंबई पूर्वपदावर येत आहे असे वाटत आसनातच सकाळी एकएक करून मुंबईतील सर्व विभागांतील वीज तांत्रिक अडचणीमुळे गायब झाली सनी आणि मुंबईच बंद झाली. त्यावरून भाजपचे नेते आमदार आशिष शेलारांनी महाविकास आघाडी सरकार विशेषता उर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
ठाकरे सरकार यातून किती दिवे लावतंय हे यातून दिसतंय, सर्किटचं कारण देणाऱ्या सरकारचंच सर्किट ठिकाणावर आहे का?, मुंबईत मोठ्या प्रमाणात नियोजनशून्यता, रुग्ण प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल, ऊर्जामंत्री कुठे आहे?, एका सर्किटच्या देखभाल दुरुस्तीसाठी सगळा भार दुसऱ्यावर, प्रशासनाकडून कुठलाही पर्याय तयार नसल्याने बत्ती गुल, कल्पना शून्य सरकार, सर्किट देखभाल दुरुस्तीची कल्पना संस्था, जनतेला का दिली नाही?, ऊर्जामंत्र्यांनी जनतेला वीज गायब होण्यामागचा खुलासा द्यावा,असे भाजप नेते आशिष शेलारांनी सरकारला प्रश्न विचारले आहेत.