कोरोना काळातील वीज बिल रक्कम माफ, ग्राहकांना १०० युनिटपर्यंत वीज मोफत देऊ अशी घोषणा करत नंतर युर्टन घेतल्याने ऊर्जामंत्री नितीन राऊत वादात सापडले. त्यानंतर वीज देयकांची थकबाकी वसूल झाल्यावर १०० युनिटपर्यंत वीजमाफीवर विचार करू, असे त्यांनी सांगितले आहे.
ग्राहकांना १०० युनिटपर्यंत वीज मोफत देणं शक्य नाही. त्यामुळे आता महावितरणकडून थकबाकी वसुलीवर जोर देण्यात आला आहे. ही थकबाकी वसूल झाल्यावर पुन्हा या विषयाचा अभ्यास करून ग्राहकांना १०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्यावर विचार केला जाईल, असेही ऊर्जामंत्र्यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या विज बीज वसुलीविरोधात राज्यातील ठिकठिकाणी भाजपाकडून आंदोलन सुरु आहे. सरकारने कोरोना काळातील तरी विजबील माफ करावे या मागणासाठी भाजपा ठाकरे सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहे.