अनिल संगणगिरे
वेब सिरीज; THE GONE GAME
कलाकार; संजय कपूर, श्रिया पिळगावकर, श्वेता त्रिपाठी, अर्जुन माथूर, रुखसार रहमान
दिग्दर्शक; निखिल भट
IMDB रेटिंग: 8/10
OTT APP: VOOT
वेबसेरीज ची आवड असणाऱ्या प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरणारी वेबसिरीज म्हणजेच The gone game. सस्पेन्स ने ठासून भरलेली कथा, दमदार अभिनय, आणि दिगदर्शन क्षेत्रातील नवीन पायंडा रचणारी ही वेब सिरीज.
ह्या सिरीज ची कथा “गुजराल ” परिवराभोवती गुंफण्यात आलेली आहे जे प्रत्येक अडचणीत एकमेकांसोबत असतात, लॉकडाउन मूळे ह्या परिवारातील सगळे सदस्य एकमेकापसून खूप दूर आहेत पण हे सगळे मोबाईल , विडिओ कॉल ह्यामार्फत दररोज कनेक्टेड असतात, पण कथेत ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा या परिवारातील मोठा मुलगा साहिल गुजराल याचं अचानक कोरोनामुळे निधन होतं आणि ह्या परिवाराच्या सुखाला जणू ग्रहनच लागतं. इथुन खरा सस्पेन्स सुरू होतो यानंतर काही आशा घटना घडतात की ज्यामुळे साहिल जीवंत आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो .
खरंच साहिल जिवंत आहे का?
साहिल चं कुणी खून केलंय की तो कोरोनामुळेच मेला?
की तिसरंच काही सत्य आहे हे पाहण्यासाठी आपल्याला voot select वर जाऊन ही सिरीज पहावी लागेल.
ह्या सिरीज चं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे 50 टक्के सिरीज रेकॉरडेड विडिओ क्लिप्स वर झालेली आहे आणि मोबाइल स्क्रीन व लॅपटॉप स्क्रीन चा पुरेपूर वापर करून अगदी व्हर्च्युअल सिरीज बनवण्याचा सुंदर प्रयत्न केला गेलाय. एडिटिंग साठी पैकीच्या पैकी गुण आणि दिग्दर्शकाला त्रिवार अभिवादन…