वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेची हत्या

23

ठाण्याजवळ असलेल्या भिवंडी शहरात हनुमान टेकडी येथे 25 वर्ष तरुणीची गुरुवारी हत्या झाली आहे. रात्रीच्या वेळीस अज्ञात ग्राहकांनी तिच्या राहत्या घरात हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही मुलगी वेश्या व्यवसाय करत होती. या गुन्हेगारांचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले.

गुरुवारी रात्री तिच्याकडे ग्राहक आले होते. नागरिकानांही त्यांच्यावर संशय असल्याचं आढळून आलं. या प्रकरणात दोन सख्ख्या भावांना अटक करण्यात आले. हत्येपूर्वी दोघांनीही तरुणीवर बलात्कार केला होता. तिच्या गुप्तांगास इजा करून त्यानंतर तिचा ओढणीने गळा आवळून हत्या केली होती. मोठ्या भावाचे तरुणीवर एकतर्फी प्रेम असल्याचे समोर आले. आणि लहान भावाच्या पत्नीशी मृत तरुणीचे भांडणही झाले होते. या वादातुन दोन्ही सख्ख्या भावांनी मिळून तरुणीच्या घरी ग्राहक म्हणून जाऊन हत्या केली.

सर्व माहितीनुसार ही तरुणी बांगलादेशी असल्याचं समजलं आहे. तिची खोली हनुमान टेकडी येथे रस्त्याच्या सर्वात शेवटी आणि कोपऱ्यात होती.